भाजीत भाजी मेथीची,
……माझ्या प्रितीची.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…. आहेत आमचे फार नाजुक.
लग्नात्त लागतात हार आणी तुरे
…. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
…..च नाव आहे लाख रुपये तोळा
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
— ला भरविते जिलेबिचा घास
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
–चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव — आणि — च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा
कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
चान्दिच्या ताटात फणसाचे गरे …..
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे
नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
—– चे नाव घेण्यास आजच केली सुरवात
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
—– चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद
दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ….
साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्
नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिरवाद्,
…..चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
……च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
…चे नाव घेते राखते तुमचा मान
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
पाव शेर रवा पाव शेर खवा
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
बारिक मणी घरभर पसरले,—–
साठि माहेर विसरले
हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
—रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी
सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
…रावाचे नाव घेते …ची सुन
मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर,
—रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
…. चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास
पेरु खाते चिरुन संत्री खाते सोलुन केळीची काढते साल
— रावाच्या नावाचे कुंकु लावते लाल
काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत
— राव गेले ऑफिसला मला नाही करमत
केळीचपान पान चुरुचुरु फाटत …
….रावाच नाव घेताना लई भारी वाटत
सुर्यमा मावळला, चन्द्रमा उगवला,
रजनी टाकते हळुच पाउल,
— आणि — च्या संसारात,
लागली बाळराजाची चाहुल
एक होति परि …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरि
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
…….रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले
आणि ………..नाथा मी तुज़ीच जाहले
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ——- ची जोडी
रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य —– च्या सहीत
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
—– नाव घेते सोडा माझी वाट
भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
रावांच्या मिठित विसरते मी माहेर
श्रावणात पडतात सरीवर सरी
—–रवांच नाव घेताना मी होते बावरी
ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
—- नाव घेते सौभाग्य माझे
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि —-
रावांचे नाव घेते —च्या लग्नाच्या दिवशि
च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!
……………………………………………………
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
……………………………………………………..
***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
……………………………………………………
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
…………………………………………………….
उंच उंच डोंगर हिरवे.. त्याला टेकतं आभाळ..
….. रावांचं काय नाव घेऊ…. कपाळ??
सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!!
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर…
***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर
एक होती चिऊ एक होती काऊ…
***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ…
कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा …
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस
कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र
***** नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
ईवले ईवले ह्रीण, त्याचे ईवले ईवले पाय,
****** राव आले नाहीत अजुन,
पिउन पडले की काय……. !!
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ
एक होती चिऊ एक होती काऊ
गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ
अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे
बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास
आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार
कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला
……..शी लग्न करून ……जन्माचा धुपला
कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क
रेशमी सदर्याला प्लास्टीकचे बक्कल
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल
समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू
लाडाने जवळ गेले, केली जरा घसट
गणपतराव एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !
बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
*****राव बिड्या पितात संडासात बसून
आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
आणि ……. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
…. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा.
मोठा मुलगा श्मभु
******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा
अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…. आहेत आमचे फार नाजुक.
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘ ,
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा.
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.
मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
— हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर
कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… आहेत फार निस्वार्थी
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
… घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
…च्या जीवावर करते मी मजा
वन, टु, थ्री
…. चं नाव घेते मला करा फ़्री.
इवल्या इवल्या हरीणा चे इवले इवले पाय
……राव आले नाही घरला कुठे पिऊन पडले की काय.
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर,
…..चे नाव घेते ….ची लव्हर.
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू
……….राव दिसतात साधे पण आतून चालू.
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
………राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.
स्टुलावर स्टुल बत्तीस स्टुल,
……..राव एकदम ब्युटिफ़ुल.
गणपतरावांबरोबर चित्रपट पाहिला त्याचे नाव सायको,
वामनरावांचे नाव घेते चिमनरावांची बायको.
गव्हावर गहू नऊ गहू
लग्न नाही झाले तर, नाव कोणाचे घेऊ?
चांदीच्या ताटात शिळ्या भाकरीचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या थोबाड कर इकडे.
घरापुढे अंगण,
अंगणापुढे ओसरी,
ओसरीपुढे माजघर,
माजघरात फ़डताळ
फ़डताळात चांदीचा भगुला
भगुल्यात ठेवला खवा
…..राव आले घरला आता तुम्ही जावा.
पुण्याच्या तुलशी बागेत आहे श्री रामाचं मंदिर. श्री रामाच्य मंदिरात आहे रामाची मुर्ती,
रामाच्या मुर्तीच्या बाजूला सितेची मुर्ती, सितेच्या कमरेला सोन्याचा घडा,
सोन्याच्या घड्यार केशराचे पाणी, तुमच्यासाठी नाव घेते ….
ची राणी..
चषम्याच्या काचावर चुकून
बसली होती माशी
चषम्याच्या काचावर चुकून
बसली होती माशी
गणपत राव समजून
गेले दगडू रावां पाशी
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले…..
…..रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले
देवघ्ररात तेवतो नंदादिप समाधानाचा
— च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा..
शब्दा शब्दानी बनते वाक्य
वाक्या वाक्यानी बनते कविता
…..माझे सागर मी त्यांची सरिता
नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
…. चे नाव घ्यायला मी कशाला लाजू ..
हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका, …चे नाव घेते ….चि बालिका.
चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा
……… च्या नावाने भरला हिरवा चुडा
अबोलिच्या फुलाचा गंध् काहि कळेना
—चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना
डोमिनोज चा पिझ्झा ला चिज चा स्वाद..
… चे नाव घेण्याचा लागला मला नाद..
अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
…………………. रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी
कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
….. आहेत माझे पूर्व संचित
लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
…. च्या जीवावर कर्ते मी मजा.
सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
….. चे नाव घेऊन घेते मी रजा.
नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
…..नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी
वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
….. चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते.
अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
….. चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.
धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
….. च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते
भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
….. चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
……. चे नाव घेते सत्यनारायणापुढे
आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
— चं नाव घ्यायला — अडवले
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
—- बसले दारात मी जाऊ कशी घरात
रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य —– च्या सहीत
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ——- ची जोडी
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
— नाव घ्यायला आग्रह कशाला
कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
….. आहेत माझे पूर्व संचित
लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
…. च्या जीवावर कर्ते मी मजा.
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा
भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,
….ना करीते मी रोजच वंदन.
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल
हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
…. हाच माझा खरा दगिना.
=श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
…. सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो — – — ची जोडी
पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित
जलु नका लोकहो … राव आहे आय़् टीत
अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्
सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
…चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड
कपाळावर लावले कूंकू लाल लाल,
…. च्या जीवावर आहे मालीमाल
भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,
…… चे ठेवीन सदोदित मान.
थोरातांच्या दुधावर येते जाड साय,
……. ना जन्म देणरी धन्य ती माय
फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती ,
विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती
ग.दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी गायिले
सुरेशरावां करिता मी पुणे पाहीले
चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा ,
…म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा
मानवाने करु नये कुणाचा हेवा ,
प्रकाशराव म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थाने सेवा
घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून …च्या घराची बेल
रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
—— ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास
मंथरेमूळे घडले रामायण,
….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण
सुहासिनीने करावे नेहमी सोळा श्रूंगार,
…….आहे माझे प्रेमळ भरतार
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा.
अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी,
….. नी आणलीये सुगंधी वेणी.
गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
…. चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून …….. रावांची मी सॉभाग्यवती झाले
ओssम या शब्दात आहे दिव्य शक्ती ,
…रावांवर करते मी अमर प्रीती
दैन्ंदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व
रामरावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व
गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
….. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर
विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची,
….. चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची
उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव,
आज आहे मंगळागॉरी ….. चे घेते मी नाव.
जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन,
… चे नाव घेते …. ची सुन.
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,….नी लावला गुलाबांचा मळा,
किंवा …..च्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
….चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती,
….ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले
मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती,
….रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती
संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले,
….ची मी आज सौभाग्यवती झाले
वर्षाकाठचे महिने बारा,
….या नावात सामवलाय आनंद सारा.
एक तीळ सातजण खाई,
…..ना जन्म देणारी धन्य ती आई.
पाव शेर रवा पाव शेर खवा,
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार…
……….. रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!
मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
— मुळेच माझ्या जीवनाला अर्थ…
उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु…
…रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु..!
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ….. आहे माझी अर्धांगिनी !!!!!
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!
दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ….. च्या संग !!!!!
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ….ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!
सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!
चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ….चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!
