भावपूर्ण प्रार्थना आणि श्रद्धांजली
अजूनही होतो भास,
तुम्ही आहात जवळपास।
शांती लाभो तुमच्या आत्म्यास,
हीच प्रार्थना परमेश्वरास।
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन।
स्मृतींचा रंग
मुठीत मावल्या नाही उधळून गेल्यात स्मृती,
इंद्रधनुष्याचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती।
जाणीव नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती,
तोल ढळता ढळता सावरून गेल्या स्मृती।
समोर सावलीशी दिसली बावरून गेल्या स्मृती,
तमाची छाया घनदाट उजळून गेल्या स्मृती।
वियोगाचा वणवा उरी पेटवून गेल्या स्मृती,
ती शेज शरांची होती जगवून गेल्या स्मृती।
कोमजले होते आत काही, उमलून गेल्या स्मृती,
साथ कधीही सोडणार नाही सांगून गेल्या स्मृती।
आपल्या आदर्शांचे स्मरण
आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही,
अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही।
सर्वांच्या ह्रदयावर राज्य केले तुम्ही,
माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही।
म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात तुम्ही।

अचानक निरोप
एक दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात।
सर्व काही ओळखीच्या वाटेवर,
केवळ स्मृती ठेवून गेलात।
शुन्यामधून विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवून,
लोभ माया, प्रीती देवून, सत्य सचोटी मार्ग दाखवून,
अमर झाला तुम्ही जीवनी।
आशीर्वाद आणि आठवण
सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने,
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने।
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला,
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली।
आपली शिकवण… हीच आठवण।
प्रेमळ आठवण
प्रेमळ होतास तु, विसरेल कसे कुणी?
मनात येतात दाटून,
सदैव तुझ्या आठवणी।
आत्म्यास शांती लाभो,
हीच प्रभू चरणी विनवणी।
तुमचं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं।
स्मृतिदिन अभिवादन
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते।
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे,
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे।
समाजात एक प्रेमाचा, एक्याचा, देशसेवेचा, देश प्रेमाचा, बंधुभावाचा
आदर्श प्रस्तापित करण्यासाठी जन्माला आलेले
एक विनयशील व्यक्तिमत्त्व,
(गावाचे नाव) या गावातील एक अनमोल रत्न,
म्हणजेच (मृतकाचे नाव) यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन।
पवित्र तुमची स्मृती,
चिरंतन तुमची माया,
नित्य असूद्या आमची वरती,
अखंड तुमची छाया।
कष्ट आणि आठवण
चंदनापरी देह झिजविला,
कष्टातून संसार फुलवला।
उरली नाही साथ तुमची आम्हास,
आठवण येते क्षणक्षणाला।
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही,
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही,
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही,
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही।
“आपले निघून जाणे म्हणजे आम्ही पोरके होणे”!
आपली शिकवण आणि आपली आठवण आमच्या मनात चिरंतन तेवत राहील।
स्मृतिदिन संदेश
जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला,
आमचे प्रिय ….. यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन।
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे।
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी।
हसतमुख उमदा चेहरा,
अकाली काळाने हिरावून नेला।
कर्तव्यपूर्तीसाठी चंदना प्रमाणे झिजावे,
असा संदेश देऊन गेला।
आजच्या या पुण्यस्मरणदिनी साश्रूपूर्ण
नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली।
अखेरची श्रद्धांजली
आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली।
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली।

स्मृतिदिन संदेश मराठी:
पवित्र स्मृतींची ज्योत तेवते,
अखंड आमच्या मनी,
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी।
आठवुनी अस्तित्व, दिव्य, तव वृत्ती भारावली।
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली।
शोधूनही सापडत नाहीये,
म्हटल्यावर,
खरंच फार दूर गेलेत हे स्वीकारावं।
प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली।
तो हसरा चेहरा,
नाही कुणाला दुखावले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा।
उडूनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची इच्छा।
पुण्यस्मरण मराठी स्टेटस आणि स्मृतिदिन संदेश
पुण्यस्मरण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची आठवण ठेवण्याचा दिवस. ज्या दिवशी त्या व्यक्तीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होते, त्याला प्रथम पुण्यस्मरण असे म्हणतात. त्याचप्रमाणे दोन वर्ष पूर्ण झाल्यावर द्वितीय पुण्यस्मरण आणि तीन वर्ष पूर्ण झाल्यावर तृतीय पुण्यस्मरण साजरे केले जाते.
मित्रांनो, येथे आम्ही काही सुंदर पुण्यस्मरण मराठी स्टेटस, स्मृतिदिन संदेश, तसेच आई-वडील, आजी-आजोबा यांच्यासाठी प्रथम पुण्यस्मरण संदेश शेअर केले आहेत. हे मराठी संदेश तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील, अशी आशा आहे. धन्यवाद.
